Workshops:
workshops play a pivotal role in introducing hobbies and passions at an early age, serving as stress relievers and keeping hands busy, thereby diverting attention away from gadgets.
Skills are as important as formal education. They constitute a crucial aspect of one’s personality. Children between the ages of 8 and 12 are at their peak in terms of grasping capacity, creativity, and adaptability. They are enthusiastic about learning diverse subjects during this period. Providing them with opportunities to explore their capabilities at this age can positively influence their thinking capacity and overall personality. Therefore, we organize various workshops tailored for this age group. Till date the workshops were conducted on Writing skills, Art & Craft, Emotional Intelligence, career guidance.
Every student needs to write during their academic life, as it is a valuable skill. Proficiency in writing not only aids in education but also proves beneficial in later stages of life. Certain career paths require strong writing abilities. To cultivate this skill, we organized a workshop focused on developing writing skills. Mr. Rajiv Tambe, a writer and children’s author, provided guidance to the enrolled students during this workshop.
Drawing is beloved by everyone during their school days. To introduce various forms of drawing, we launched a workshop called “Aakaar”. This workshop provided hands-on experience with different drawing media and crafts. Experts taught students skills and techniques starting from the basics. The workshop covered calligraphy, clay modelling, bamboo craft, acrylic painting, canvas painting, charcoal painting, paper craft, nature rangoli drawing and stone painting, with each subject taught by a specialist in the field.
EQ, or Emotional Intelligence, involves understanding and managing both one’s own emotions and those of others, making it crucial for every individual. It is a skill that can be developed and improved over time. Anunaad organized a workshop focusing on EQ for students, covering topics such as the definition of emotions, strategies for dealing with them, enhancing the thinking process, and improving decision-making abilities.
The workshop was guided by Mr. Joshi, a psychologist, counsellor, and professor with over 12 years of experience in the field.
विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या कला व कौशल्ये देखील खूप महत्वाची असतात. व्यक्तिमत्व विकासातील तो एक महत्वाचा पैलू आहे.
इयत्ता पाचवी ते आठवी या वयोगटातील मुलांची आकलन शक्ती, त्यांची सर्जनशीलता ही अतिशय चांगली असते. या वयात वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची, वेगवेगळे अनुभव घेण्याची त्यांची क्षमता उत्तम असते. याच वयात जर चांगल्या गोष्टी त्यांच्या समोर आणल्या, त्यांना विचार करायला वाव मिळाला तर विचारशक्ती, आकलन क्षमता सुधारते ज्याचा चांगला परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो.
म्हणूनच या वयातील मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतो.
लेखन करणे ही विद्यार्थीजीवनातील एक अपरिहार्य गोष्ट आहे. पण ते एक कसब देखील आहे. कसे लिहायचे हे जर समजले तर त्याचा उपयोग परीक्षेत तर होईलच पण काही करिअरच्या संधी देखील यामुळे मिळू शकतात. यासाठीच अनुनाद तर्फे एक लेखन कार्यशाळा घेण्यात आली होती. बालसाहित्यकार श्री. राजीव तांबे सरांनी या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
रंग आणि कुंचला हा सगळ्यांचाच आवडता विषय. मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा व निरनिराळ्या कलांशी तोंडओळख व्हावी यासाठी ‘आकार’ ही कार्यशाळा अनुनाद तर्फे आयोजित केली होती. वेगवेगळ्या आठ कलांची ओळख त्या त्या विषयातील तज्ञांमार्फत मुलांना करून देण्यात आली. सुलेखन, मातीकाम, बांबूकाम, ऍक्रेलिक व कॅनव्हास वर चित्रकला, निसर्ग रांगोळी, चारकोल (कोळसा) पेंटिंग, कागद काम, स्टोन पेंटिंग हे सर्व विषय या कार्यशाळेत शिकविले गेले.
स्वतःच्या व समोरच्याच्या भावना ओळखणे आणि त्यांचे योग्य प्रकारे नियमन करणे, त्या योग्य प्रकारे हाताळणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता – EQ. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्व आपण जाणतोच. ही बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी नेमके काय करायचे, भावना म्हणजे नेमके काय, त्यांचे वर्गीकरण, सारासार विचार आणि योग्य निर्णय या विषयांची ओळख मुलांना व्हावी यासाठी या विषयाची कार्यशाळा अनुनाद तर्फे घेण्यात येते.
गेले १२ वर्षांपेक्षा जास्त काळ या विषयावर काम करणारे, व्यवसायाने प्रोफेसर असलेले, डॉ. जोशी सर यांच्या मार्फत ही कार्यशाळा घेतली जाते.