Value Based Education:
Anunaad believes in investing in character building, cultivating good habits, and instilling simple civic sense in young minds, which will ultimately contribute to creating responsible citizens and fostering nation-building.
Young children are the future and to be responsible citizens of the country. Young minds are gifted; curious and inquisitive in nature. They have immense imagination and many queries in their mind. Children are adaptive at an early age. They observe and absorb what they listen, see and feel.
But in school it becomes challenging for teachers to focus on each and every child to develop these life skills during regular classes due to lack of time and the pressure of completion of syllabus.
Anunaad is offering Story and activity based interactive learning to develop students’ thinking ability, observational skills, linguistic and verbal skills and basic values such as honesty, respect, responsibility and accountability in a play way method.
If we provide appropriate exposure and environment to the children at an early age; they will grow into better human beings, responsible citizens with good values and fulfilling life.
मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. वैयक्तिक आणि सामाजिक दृष्टीने मूल्यशिक्षण अत्यावश्यक आहे. प्रतिकूल किंवा कठीण प्रसंगांत तुम्ही कसा विचार करता, कसे निर्णय घेता, माणूस म्हणून तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा कसा विचार करता या सर्व गोष्टींवर तुमचे व्यक्तिमत्व अवलंबून असते.
शालेय शिक्षण मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणातून विविध मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजली जाऊन त्यानुसार ते समाजामध्ये वावरत असतात. म्हणूनच मूल्यशिक्षण हे लहान वयापासून अतिशय गरजेचे आहे.
मूल्यशिक्षण हा विषय पुस्तकी नाही. मनावर काम करत असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये, वर्तणुकीत सकारात्मक बदल दिसण्यासाठी काही वर्षे काम करण्याची गरज आहे. अनुनाद मार्फत सलग दोन वर्षे आपण एका शाळेत हा उपक्रम घेत आहोत. वेगवेगळे कृतिशील प्रयोग, खेळ यांमार्फत हसत-खेळत हि मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.