Digital Literacy:
Anunaad’s focus is to make the E-Learning systems available in the Government or the Zilla Parishad run schools in the remote places.
A major divide in the accessibility of the technology, internet, basic smartphone, digital devices and Digital Learning platform in rural and urban areas was quite evident during Pandemic time of Covid 19. And it adversely affected the continuation of education.
Anunaad stepped in to address this concern and provided specially designed economical e-learning systems to schools.
What is the Smart Solution?
E-learning system is a low cost and easy to install and operate; audio-visual tool which does not rely on any internet or mobile network. And it’s an effective aid for teachers with integrated assessments, exercises for the complete syllabus.
E-learning system features:
- No Internet Connectivity required.
- Two hours of uninterrupted battery backup for the system.
- Student can opt for self-learning mode
- Basic and simple set up with AV format.
- I-X grade (SSC, CBSE syllabus for Marathi & English Medium)
लॉकडाउन च्या काळात मुलांच्या शाळा बंद होत्या. अशा वेळेस मुलांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्यांना दिलेला अभ्यासक्रम समजावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यांसाठी ‘स्मार्ट अभ्यासिका’ या प्रकल्पाची संकल्पना राबवली गेली. एका अभ्यासिकेत एक मॉनिटर किंवा प्रोजेक्टर, कीबोर्ड, माउस, स्पीकर आणि अभ्यासक्रमानुसार साहित्य या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
ग्रामीण भागात शाळेत येणारे विद्यार्थी हे शाळेपासून लांब असलेल्या वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये राहतात. लॉकडाउन च्या काळात शिक्षक देखील या वस्त्यांवर जाऊ शकत नव्हते. फक्त फोन वरून संपर्क साधणे शक्य होते. अशा वेळी विद्यार्थ्यांचा शाळेशी, अभ्यासाशी संपर्क तुटू नये यासाठी विविध पाड्यांवर, वस्त्यांवर या अभ्यासिका बसवल्या गेल्या ज्यामुळे ही मुले अभ्यास करू शकली.
आज सुद्धा काही ग्रामीण भागांतील शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. एका शिक्षकाला एका पेक्षा जास्त वर्गांकडे लक्ष द्यावे लागते. अशा वेळेस या सिस्टिम चा उपयोग होतो. शिक्षकाचे काम काही प्रमाणात ही सिस्टिम करू शकते. विद्यार्थी या अभ्यासिकेचा उपयोग करून स्वअभ्यास करू शकतात.
या अभ्यासिकेत सर्व विषय असून प्रत्येक विषयाची मांडणी ही AV format मध्ये आहे. ऍनिमेशन चा वापर विषय समजावण्यासाठी केला गेलेला असल्याने विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करताना कंटाळवाणे होत नाही.
स्मार्ट अभ्यासिकेचे फायदे :
१. SSC बोर्ड वर आधारित E-Learning अभ्यासक्रम
२. इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या प्रत्येक विषयाचे, ‘स्वतंत्र धडा, सारांश आणि प्रश्नोत्तरे’ अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण
३. ऍनिमेशन द्वारे प्रत्येक धड्याची साधी, सोपी, सरळ मांडणी
४. हसत-खेळत आनंददायी शिक्षण
५. कमी कालावधीत शैक्षणिक गुणवत्ता आणि मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत
या अभ्यासिकेचे सर्वांत महत्वाचे फायदे :
१.ही अभ्यासिका वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. दूरवरच्या खेड्यांवर, वस्त्यांवर नेट ची सुविधा नसते. तरी देखील विद्यार्थी या अभ्यासिकेच्या मदतीने व्यवस्थित अभ्यास करू शकतात.
२.प्रत्येक धडा अर्थासकट मुलांपर्यंत पोचवण्यासाठीचा शिक्षकांचा उत्तम मदतनीस